Pune News : जनसेवा सहकारी बँकेला ‘कोरोना वॉरिअर’ पुरस्कार

एमपीसी न्यूज – कोरोना काळात उल्लेखनीय काम केल्याबद्दल पुण्यातील जनसेवा सहकारी बँकेला ‘कोरोना वॉरिअर’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. ग्रीन वर्ल्ड आणि कॉसमॉस को.ओ. बँकेच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला.

जनसेवा सहकारी बँकेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक अॅड. सतिश गोरडे यांना सहकार आयुक्त महाराष्ट्र राज्य अनिल कवडे, एअर मार्शल भूषण गोखले, कॉसमास बँक चेअरमन सी ए मिलींद काळे, गौतम कोतवाल यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.