Talegaon Dabhade News : जनसेवा विकास समितीच्या वतीने चिपळूण येथील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत

एमपीसी न्यूज : चिपळूण (रत्नागिरी) येथील पूरग्रस्तांना जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव दाभाडे शहरातील नागरिकांच्या सहकार्याने कपडे, बिस्कीट, लाडू, पाण्याच्या बॉटल, तेलाचे डब्बे, दूध पॉवडर, साबण, कोलगेट, फिनेल, ब्लॅंकेट, चिक्की, तांदूळ आदी जीवनावश्यक वस्तू  चार ट्रकमध्ये रविवारी (दि.25) सायंकाळी 6 वा. रवाना करण्यात आले.

जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे म्हणाले नैसर्गिक संकटात असलेल्या आपल्या बांधवांना मदत करणे ही आपली सामाजिक बांधिलकी आहे. जनसेवा विकास समितीच्या वतीने सलग चार महिने जनसेवा थाळी उपक्रम सुरु आहे. आज ज्यांना खरी मदतीची आवश्यकता आहे. त्यांच्या संकट काळात जनसेवा विकास समिती व तळेगाव दाभाडेचे नागरिक सक्षमपणे त्यांच्या पाठीशी आहेत.

मावळ तालुक्यातील पहिलीच भरघोस मदत पाठविताना आम्हाला  समाधान वाटत आहे. आणखी मदत लागली तरी आम्ही  सज्ज आहोत. पुरात मृत्यू झालेल्या बांधवांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मदत घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकांना नागरिकांनी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे, कल्पेश भगत, मिलिंद अच्युत, अनिल कारके, मनिष शेळके, रमेश भोंग, गोरख कार्ले, सागर दाभाडे, अविनाश बोडके, सचिन मुळे, प्रणय बुरांडे आदी उपस्थित होते.

जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे म्हणाले नैसर्गिक संकटात असलेल्या आपल्या बांधवांना मदत करणे ही आपली सामाजिक बांधिलकी आहे. जनसेवा विकास समितीच्या वतीने सलग चार महिने जनसेवा थाळी उपक्रम सुरु आहे. आज ज्यांना खरी मदतीची आवश्यकता आहे. त्यांच्या संकट काळात जनसेवा विकास समिती व तळेगाव दाभाडेचे नागरिक सक्षमपणे त्यांच्या पाठीशी आहेत.

मावळ तालुक्यातील पहिलीच भरघोस मदत पाठविताना आम्हाला  समाधान वाटत आहे. आणखी मदत लागली तरी आम्ही  सज्ज आहोत. पुरात मृत्यू झालेल्या बांधवांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मदत घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकांना नागरिकांनी शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.