Shinzo Abe resigns: जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांचा राजीनामा

शिंजो आबे हे प्रकृती अस्वास्थामुळे रुग्णालयात उपचार घेत आहेत. मागील काही महिन्यांत त्यांना अनेकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

एमपीसी न्यूज – जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. प्रकृतीच्या कारणास्तव त्यानी राजीनामा दिला असल्याचे सांगितले जात आहे.

शिंजो आबे हे प्रकृती अस्वास्थामुळे रुग्णालयात उपचार घेत आहेत. मागील काही महिन्यांत त्यांना अनेकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

शिंजो आबे हे मागील आठवड्यात दोन वेळेस रुग्णालयात दाखल झाले होते. सातत्याने रुग्णालयात उपचारासाठी जात असल्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबतही उलटसुलट चर्चा सुरू होत्या. काही दिवसांपूर्वी जवळपास सात तास आबे रुग्णालयात दाखल होते. आबे यांच्या पंतप्रधानपदाचा कार्यकाळ सप्टेंबर 2021 पर्यंत होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.