Pune News : ..’त्या’ जातपंचायत प्रकरणी अधिवेशनात आवाज उठविणार – प्रवीण दरेकर

एमपीसी न्यूज : पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील कंजारभाट समाजातील एका जोडप्याला जातपंचायतीने वाळीत टाकण्याचा प्रकार घडलाय. या प्रकरणात पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केलाय. परंतु 20 नोव्हेंबरला गुन्हा दाखल होऊन देखील हे पाच ही आरोपी अद्याप मोकाट आहेत. त्यामुळे आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पुण्याच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन आरोपींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली. तसेच या प्रकरणी अधिवेशनात आवाज उठविणार असल्याचे प्रवीण दरेकर यांनी सांगितले. 

पुरंदर तालुक्यातील सासवड गावा जवळ कंजारभाट समाजातील एका महिलेने वडिलोपार्जित मालमत्तेचा न्यायनिवाडा जातपंचायती समोर सुरू असताना त्यामध्ये हस्तक्षेप केला. त्यामुळे चिडलेल्या जातपंचायतीच्या पंचांनी ही महिला आणि तिच्या पतीला समाजातून बहिष्कृत करण्याचा निर्णय घेतला. त्याविरोधात या जोडप्याने पोलिसांकडे तक्रार केली आहे. परंतु समाजाच्या दबावामुळे हे जोडपं पुढे येऊन बोलण्यास तयार नाही. पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय परंतु आरोपींना अटक करण्यात यावी अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी पोलिस अधीक्षकांना भेटून केलीय. त्याचबरोबर येत्या अधिवेशनात देखील असे प्रकार रोखले जावेत यासाठी आवाज उठवणार असल्याचं दरेकर यांनी म्हटलंय.

प्रविण दरेकर म्हणाले की, राज्यात मागील काही वर्षात जात पंचायतीच्या घटना लक्षात घेता. 2016 साली समाजिक बहिष्कार कायदा आणला गेला. तरी देखील अद्याप ही अशा घटना घडत असून या घटना सामाजिक आणि एकतेला धक्का देणारे आहेत. एका बाजूला सरकारची भूमिका आहे की, जातिवाचक वाड्या वस्ती वरील नावे बदली जाणार, पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ढोल वाजवितो. त्याच दरम्यान अशा घटना घडतात. त्यामुळे याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.