PCMC : जत्रा शासकीय योजना अभियानाची महापालिकेत सुरुवात

एमपीसी न्यूज – शासकीय योजना लोकाभिमुख करून त्याची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी शासन आपल्या दारी, जत्रा शासकीय योजनांची, सर्वसामान्यांच्या विकासाची या अभियानाची आज (गुरूवारी) महापालिकेत सुरुवात करण्यात आली.

Bhosari : विद्यार्थ्यांनी घेतले कौशल्य अन् उद्योजकतेचे धडे!

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक, पिंपरी (PCMC) येथे महापालिकेच्या समाज विकास विभाग अंतर्गत विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून महिला बालकल्याण विभाग या योजनेअंतर्गत 164 विधवा महिलांना 15 हजार व मागासवर्गीय कल्याणकारी योजनेअंतर्गत मुलींसाठी सायकल या योजनेअंतर्गत 100 मुलींना 7000 रक्कमेचा ऑनलाईन लाभ अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे आणि उप आयुक्त अजय चारठाणकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच 239 लाभार्थी यांच्या अर्जातील त्रुटींची पूर्तता करून त्यांचे अर्ज पात्र करण्यात आले व 13 नवीन अर्ज भरण्यात आले आहेत.

या कार्यक्रमास प्रशासन अधिकारी सविता आगरकर, समाजसेविका संतोषी चोरघे, लिपिक रोहित साळवी, प्रज्ञा कांबळे, महेंद्र गायकवाड, जयेश खताळ, अनिकेत सातपुते, कल्पना मदगे, मनीषा भुजबळ आदी कर्मचारी उपस्थित होते. लाभार्थ्यांना अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी मार्गदर्शन केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज विकास विभागाचे उपायुक्त अजय चारठाणकर यांनी केले. सूत्रसंचालन समूह संघटक वैशाली खरात यांनी तर आभार समूह संघटक रेश्‍मा पाटील यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.