Javed Akhtar : प्रतिष्ठित ‘रिचर्ड डॉकिन्स’ पुरस्कार प्राप्त करणारे जावेद अख्तर ठरले पहिले भारतीय 

Javed Akhtar became the first Indian to receive the prestigious 'Richard Dawkins' award बॉलीवूड कलाकार अनिल कपूर, दिया मिर्झा यांनी हा पुरस्कार मिळाल्याबद्दल जावेद अख्तर यांचे अभिनंदन केले आहे.

एमपीसी न्यूज – प्रसिद्ध लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांना प्रतिष्ठित ‘रिचर्ड डॉकिन्स’ पुरस्कार जाहीर झाला असून, हा पुरस्कार प्राप्त करणारे ते पहिले भारतीय ठरले आहेत.

प्रसिद्ध  जीवशास्त्रज्ञ रिचर्ड डॉकिन्स यांचा नावाने दिला जाणारा ‘रिचर्ड डॉकिन्स’ हा पुरस्कार प्रसिद्ध भारतीय लेखक जावेद अख्तर यांना जाहीर झाला असून, ANI या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या कुशल तसेच मानवी प्रगती व मानवतावादी मूल्ये उन्नत करणाऱ्या विचारसरनीसाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. जावेद अख्तर यांच्या पत्नी शबाना आझमी यांनी त्यांच्या ट्विटर वरून याबाबत माहिती दिली आहे.

बॉलीवूड कलाकार अनिल कपूर, दिया मिर्झा यांनी हा पुरस्कार मिळाल्याबद्दल जावेद अख्तर यांचे अभिनंदन केले आहे. जावेद अख्तर यांनी सलीम खान यांच्या सोबत शोले, जंजीर, दिवार यासारख्या प्रसिद्ध सिनेमांचे लेखन केले आहे. भारत सरकार कडून  त्यांना 1999 मध्ये पद्मश्री तर 2007 मध्ये पद्मभूषण देण्यात आला आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like