Cricket Update: मी तुमचा कर्णधार होतो, तुम्ही माझे कर्णधार नव्हता; जावेद मियाँदाद यांची इम्रान खान यांच्यावर टीका

javed miandad slams on pakistani pm imran khan for pcb मी तुमचा कर्णधार होतो, तुम्ही माझे कर्णधार नव्हता. मी राजकारणात येईन आणि मग तुमच्याशी बोलेन. मी तुम्हाला नेहमी संधी देत आलेलो आहे, पण आता तुम्ही देव झाल्यासारखे वागत आहात.

एमपीसी न्यूज – पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी अष्टपैलू खेळाडू जावेद मियाँदाद यांनी आपल्या देशाचे पंतप्रधान इम्रान खान यांना फटकारलं आहे. पाकिस्तान क्रिकेटची सध्या झालेली वाईट परिस्थिती इम्रान खान यांच्यामुळे झालेली आहे, असा आरोप मियाँदाद यांनी केला आहे. खेळाविषयी कोणतीही माहिती नसलेल्या लोकांना इम्रान खान यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर आणून बसवलं. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट सध्या संकाटात असल्याचं मियाँदाद म्हणाले.

मियाँदाद आपल्या यू-ट्युब चॅनलवर देशांतर्गत क्रिकेटच्या परिस्थितीबद्दल बोलत होते. ते म्हणाले की, पीसीबी मधल्या एकाही अधिकाऱ्याला खेळाविषयी जराही माहिती नाही. मी इम्रान खान यांच्याशी याबद्दल बोलणार आहे. माझ्या देशासाठी जो योग्य नसेल त्याला मी सोडणार नाही.

पाकिस्तानात असे अनेक गुणवान खेळाडू आहेत, ज्यांचं भविष्य उज्वल आहे. या खेळाडूंनी मजूर म्हणून काम करु नये इतकीच माझी इच्छा आहे. खेळाडूंना वाऱ्यावर सोडल्यानंतर आता पाक क्रिकेट बोर्ड आपल्या कर्मचाऱ्यांचीही काळजी घेऊ शकत नाहीये.

मियाँदाद पुढे म्हणाले, मी तुमचा कर्णधार होतो, तुम्ही माझे कर्णधार नव्हता. मी राजकारणात येईन आणि मग तुमच्याशी बोलेन. मी तुम्हाला नेहमी संधी देत आलेलो आहे, पण आता तुम्ही देव झाल्यासारखे वागत आहात.

जसं काही या देशात तुम्हीच एक हुशार माणूस आहात असं तुमचं वागणं आहे. जसं काही पाकिस्तानमधून कोणताही माणूस ऑक्सफर्ड आणि केंब्रिज विद्यापीठात शिकायलाच गेला नाही. या देशातली लोकांची तुम्हाला काळजी नाही असंच दिसतंय, अशा शब्दांत मियाँदाद यांनी इम्रान खान यांच्यावर टीका केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.