Dirty Toilets: पं.जवाहरलाल नेहरू मुलांच्या शाळेतील स्वच्छतागृहात घाणीचे साम्राज्य, ठेकेदार व प्रशासनावर कारवाईची मागणी

एमीपीसी न्यूज : नेहरूनगर येथील पं.जवाहरलाल नेहरू मुलांची शाळा क्रमांक दोन येथे शिक्षण विभागाच्या ठेकेदाराने स्वच्छतागृह तर उभारले पण तेथे पाण्याची टाकीच बांधून दिली नाही त्यामुळे परसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे त्वरीत दोषी ठेकेदार व क प्रभागीय अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी, (Dirty Toilets) अशी मागणी पिंपरी-चिंचवड येथील भ्रष्टाचार निर्मूलन समिती यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 

शिक्षण विभागाच्या संबंधीत ठेकेदाराने शाळेच्या स्वच्छतागृहाला पाण्याच्या टाकीची सोय करून देणे अपेक्षीत होते. मात्र शाळेने टाकी न बांधताच त्याचे काम संपवले. (Dirty Toilets) यासंदर्भात प्रशासनाकडे शाळांच्या मुख्याध्यापकांनी पत्रव्यवहार केला होता. मात्र त्यावर प्रशासानाकडून कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. विशेष म्हणजे शाळेच्या संरक्षक भिंतीलाच लागून महापालिकेचे प्रभागाचे आरोग्य कार्यालय आहे. तरी जाणून-बुजून अधिकारी याकडे कानाडोळा करत आहेत.

 

Drug gang arrested: जांभे व सांगवडे येथे अफूची विक्री करणारी टोळी गजाआड

 

यामुळे शाळा परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी प्रशासन खेळ करत आहे. महापालिका आयुक्तांनी गांभीर्याने या तक्रारीकडे पाहुन शाळेत टाकीचे बांधकाम त्वरीत करावे व दोषी अधिकारी व ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्यावतीने करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.