Jayant Patil : राज्यात दोघांचाच मनमानी कारभार, हम करे सो कायदा

एमपीसी न्यूज : सरकार स्थापन महिना उलटला तरी अजूनही राज्यात मंत्रिमंडळ विस्तार झालेले नाहीये. यावरून आता शिंदे आणि फडणवीस सरकारवर विरोधी पक्ष टीका करताना दिसतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील आता सरकारवर टीका केली आहे. सरकार स्थापन होऊन 36 दिवस उलटले आहेत. मात्र अजूनही मंत्रिमंडळ विस्तार झाले नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांनीच मिळून 700 हून अधिक निर्णय घेतले आहेत. इतकच नाही तर मंत्र्यांचे अधिकार थेट सचिवना देण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे राज्यात हम करे सो कायदा अशी स्थिती असल्याचे जयंत (Jayant Patil) पाटील म्हणाले. जयंत पाटील रविवारी पुण्यात बोलत होते. 
पुणे महापालिकेतील प्रभाग रचना बदलावरून देखील त्यांनी शिंदे आणि सरकारचा समाचार घेतला. ते म्हणाले यांनी निवडणुका पुढे ढकलल्या, प्रभाग रचनेनुसार निवडणुका घेण्याचा निर्णय घेतल्याने कोट्यवधी रुपयांची नुकसान झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आता प्रभाग रचनेच्या निर्णयावरून सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले प्रभाग रचनेचा निर्णय रद्द करून सरकारने खूप मोठे नुकसान केले आहे. यामुळे राज्य सरकारचे एक कोटी रुपयांची नुकसान झाले आहे. शिंदे फडणवीस सरकारने प्रभाग रचनेचा बदललेला निर्णय रद्द करून निवडणुका वेळेत घ्याव्यात यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सुप्रीम कोर्टात जाणार आहे. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप हे सोमवारी या संदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.