Jayant Patil : मंत्री तानाजी सावंत यांची मस्ती वाढलीय – जयंत पाटील

एमपीसी न्यूज : राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे समस्त मराठा समाजाबाबत जे बोलले आहेत, ते अतिशय गंभीर आणि निषेधार्ह आहे. सावंत ज्या आत्मविश्वासाने बोलतात. त्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना बोलण्याचे अधिकार दिल्याचे स्पष्ट दिसते.(Jayant Patil) सावंत यांना पुढे करून भाजपचे लोक बोलतात. थोडक्यात काय तर सावंत यांची मस्ती वाढली आहे, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. दरम्यान, आत्ताच मराठा आरक्षणाच्या विषयाची खाज का निर्माण झाली असे वादग्रस्त विधान सावंत यांनी केले होते.

काळेवाडी येथे पत्रकार परिषदेत आज (सोमवारी) पाटील बोलत होते. शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर संजोग वाघेरे,  कार्याध्यक्ष राहुल भोसले, फजल शेख, पिंपरी विधानसभा अध्यक्ष श्याम लांडे, चिंचवडचे अध्यक्ष विनोद नढे, भोसरीचे पंकज भालेकर, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, भाऊसाहेब भोईर आदी उपस्थित होते.

पीआयएफ संघटनेच्या कार्यकर्त्यांची देशभरात धरपकड सुरू आहे. या संघटनेचे कार्यकर्ते पुण्यात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देत असतील तर हे अतिशय गंभीर आहे.(Jayant Patil) घोषणाबाजी करणाऱ्यांवर सरकारने ताबडतोब कारवाई केली पाहिजे अशी मागणी करत जयंत पाटील म्हणाले, भाजपच्या राजवटीत हे घडतेय हे त्याहून अधिक गंभीर आहे. असे प्रकार घडत असताना गुप्तचर यंत्रणा काय करत होत्या? असा प्रश्न निर्माण होतो. कायदा सुव्यवस्थेवर भाजपचे अजिबात लक्ष नाही. निवडणूक आयोग, न्यायालय याशिवाय भाजपचे दुसरीकडे कुठेच लक्ष्य नाही.

Chaturshringi Temple : चतुःशृंगी मंदिरात घटस्थापना, मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विधिमंडळात चांगले काम करतात. जनतेचे प्रश्न मांडतात. राजकारणात भाजपला राष्ट्रवादीची सर्वाधिक भीती वाटते. भाजपच्या आमदारांची संख्या 120 वरून 105 वर आली होती. राज्यातील सध्याचे वातावरण बघता 105 वरून  80 पर्यंत खाली घसरेल अशी परिस्थिती आहे. त्यामुळेच भाजपकडून राष्ट्रवादीला लक्ष्य केले जात असल्याचेही पाटील म्हणाले.

शिवसेना आणि शिंदे गटाच्या याचिकांवर उद्या सर्वोच्च न्यायालयातील घटनापीठापुढे महत्वाची सुनावणी आहे. त्याबाबत विचारले असता पाटील म्हणाले, देशात न्याय असेल. न्यायव्यवस्था शिल्लक असेल तर राज्य घटनेच्या 10 सुचिनुसार पक्षा आदेशाविरोधात मतदान केलेल्यांची आमदारकी रद्द होणे अपेक्षित आहे.(Jayant Patil) न्यायालयाच्या निर्णयाकडे आमचेही लक्ष्य असून त्याबाबत कुतूहल आहे. न्याय व्यवस्थेवर विश्वास वाटावा असा निकाल येईल. आणि आमचा विजय होईल अशी खात्री आहे.

न्यायालयाने निर्णय दिला तर 16 जणांची आमदारकी रद्द होईल.(Jayant Patil) त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश आहे. जर असा निकाल लागला तर मुख्यमंत्रीपदासाठी नवीन पर्याय निवडावा लागेल अथवा राष्ट्रपती राजवट लागू केली जाईल, अशा दोन शक्यता वर्तविल्या. त्यानंतर मध्यावधी निवडणुकांना सामोरे जावे लागू शकेल असा अंदाजही त्यांनी वर्तविला.

अजितदादा नाराज असल्याच्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना पाटील म्हणाले बावनकुळे हे मंत्रिपदाच्या विवंचनेत आहेत.(Jayant Patil) राज्यात मुख्यमंत्री बदल व्हावा आणि आपल्याला मंत्रिपद मिळावे असे त्यांना वाटत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.