Jayasree Ramaiah Suicide: कन्नड अभिनेत्री जयश्री रमैयाची आत्महत्या

एमपीसी न्यूज: कन्नड अभिनेत्री आणि बिग बॉस कन्नडची माजी स्पर्धक जयश्री रमैयाने (वय 40) आत्महत्या केली. त्यामुळे मनोरंजन विश्वाला हादरा बसला आहे. काल (सोमवारी) दुपारी ती मृतावस्थेत आढळली असून तिने फासाला लटकून आत्महत्या केली.

जयश्री रमैया ही बंगळुरूमधील एका वृद्धाश्रमात राहात होती. तिला नैराश्याने घेरले होते व बंगळुरूमध्येच ती उपचारदेखील घेत होती. जयश्री ही बिग बॉस कन्नड सीजन-3 ची कंटेस्टंट होती.

मागच्या वर्षी तिने समाजमाध्यमांवर ती नैराश्याची शिकार झाली असल्याची व हे जग सोडून जायचे असल्याची पोस्ट शेअर केली होती, मात्र काही दिवसांनी तिने ही पोस्ट डिलीट केली होती. यानंतर जयश्री समाजमाध्यमांवर लाईव्ह आली होती. ‘आता मी नैराश्याशी नाही लढू शकत, मला आता मरण हवे आहे’, असे ती या लाईव्हच्या माध्यमातून बोलली होती. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.