Chinchwad: सुरक्षित प्रवासासाठी वाहतुकीचे नियम कटाक्षाने पाळा- एसीपी नीलिमा जाधव

'यशस्वी' संस्थेच्यावतीने आयोजित वाहतूक जनजागृती अभियान संपन्न

एमपीसी न्यूज – आजच्या गतिमान जीवनात सुरक्षित प्रवास होण्यासाठी प्रत्येकाने फक्त जनजागृती अभियानापुरतेच नाही. तर, आपल्या दैनंदिन जीवनात नेहमीच वाहतुकीचे नियम कटाक्षाने पाळावेत, असे आवाहन वाहतूक शाखेच्या सहाय्यक पोलीस आयुक्त नीलिमा जाधव यांनी केले.

‘यशस्वी’ संस्थेच्यावतीने स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित वाहतूक जनजागृती अभियानप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी संस्थेचे संचालक मकरंद कुलकर्णी, संस्थेचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र सबनीस, संस्थेच्या शैक्षणिक विभाग प्रमुख डॉ. सुनीता पाटील, संचालक संजय छत्रे, ऑपरेशन हेड कृष्णा सावंत, स्वामी विवेकानंद केंद्राचे अविनाश गोखले, राष्ट्रीय सैनिक संस्थेचे मेजर प्रताप भोसले यांच्यासह संस्थेचे सर्व अध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रत्येक वाहनचालकांनी आपली घरी कुणीतरी वाट पाहतंय या गोष्टीचा विचार करून स्वतःला घाई आहे, म्हणून वाहन वेगाने चालविण्यापेक्षा पहिले आपण असे न म्हणता आपल्या वाहनांची गती मर्यादित ठेवून इतरांना पुढे जाण्यासाठी संधी द्यावी. म्हणजे अपघात होण्याचे टाळता येईल असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पवन शर्मा यांनी, आभार प्रदर्शन डॉ. राजेंद्र सबनीस यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.