_MPC_DIR_MPU_III

JEE & NEET Postponed : जेईई मुख्य आणि नीट परीक्षा पुढे ढकलली; ‘या’ आहेत नवीन तारखा

JEE postponed the main and neat exams; These are the new dates :जेईई मुख्य आणि नीट परीक्षा पुढे ढकलली; 'या' आहेत नवीन तारखा

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जेईई मुख्य आणि नीट परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. केंद्रीय मानव संसाधन व विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी याबाबत ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

_MPC_DIR_MPU_IV

रमेश पोखरियाल यांनी आपल्या ट्विटमध्ये या परीक्षांच्या नवीन तारखांचीही माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेईई मुख्य परीक्षा 1 सप्टेंबर आणि 6 सप्टेंबर दरम्यान घेतली जाणार आहे.

तर नीट परीक्षा 13 सप्टेंबर रोजी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच जेईई ( ऍडव्हान्स) 27 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.

_MPC_DIR_MPU_II

विद्यार्ध्यांची सुरक्षा आणि शैक्षणिक दर्जा यांचा विचार करून परीक्षांच्या तारख्या पुढे ढकलण्यात आल्याचे पोखरियाल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

या आधी जेईई मुख्य परीक्षा 18 जुलै आणि 23 जुलै दरम्यान, तर नीट परीक्षा 26 जुलै रोजी तसेच जेईई ( ऍडव्हान्स) 23 ऑगस्ट रोजी घेण्याचा निर्णय घेतला होता.

मात्र, कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.