Jejuri: कोरोनामुळे जेजुरीतील सोमवती अमावस्या यात्रा रद्द; निवडक उपस्थितीत धार्मिक विधी

Jejuri: Corona cancels Somvati Amavasya Yatra in Jejuri but religious rites in select presence जेजुरी हे अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. लाखो भाविक या जेजुरीत नेहमीच येत असतात.

एमपीसी न्यूज- अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या खंडेरायाची आज सोमवती अमावस्या यात्रा आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेजुरी येथील सोमवती यात्रा उत्सव जरी रद्द करण्यात आला आहे. परंपरेनुसार कऱ्हा स्नानासाठी गडकोट आवारातून प्रस्थान होणारा पालखी सोहळासुद्धा रद्द करण्यात आला आहे. मात्र नित्य सेवेकरी, पुजारी, मानकरी यांच्या हस्ते सोमवती उत्सवाचे श्रींचे सर्व धार्मिक विधी आणि कर्हेच्या पाण्याने उत्सव मूर्तींना निवडक लोकांच्या उपस्थितीत स्नान सोहळा पार पडला.

जेजुरी हे अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. लाखो भाविक या जेजुरीत नेहमीच येत असतात. उधळला जाणारा भंडारा, येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष, भंडाऱ्याच्या उधळणीने आसमंतालाला आलेले पिवळेपणा हे जेजुरीचे नेहमीचे दृश्य असतात. पण यावेळी कोरोनामुळे सर्व सोहळे रद्द करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.