BNR-HDR-TOP-Mobile

Jejuri : मोरया भक्ताचा माघी पालखी यात्रेदरम्यान भीषण अपघात

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – चिंचवड गावचे ग्रामदैवत श्री मोरया गोसावी माघी पालखीत जेजुरी येथे दोन मोरया भक्तांना अपघात झाला. ही घटना शनिवारी (दि. ७) घडली. शरद पुराणिक आणि मिलिंद पोफळे अशी अपघातात जखमी झालेल्या मोरया भक्तांची नावे आहेत.

चिंचवड गावचे ग्रामदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महासाधू श्री मोरया गोसावी यांची अनेक वर्ष माघी पालकी चिंचवड ते मोरगाव जाते. यंदाही चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने माघी पालखी चिंचवड मोरगावकडे प्रस्थान झाली. यात अनेक मोरया भक्त सहभागी झाले होते.

  • जेजुरीहून मोरगावकडे पालखी जात असताना सायंकाळी सातच्या सुमारास पायी चालणाऱ्या दोन मोरया भक्तांना एका दुचाकी वाहनाने मोरगाव रस्त्यावरील ढोले मळा येथे जोरदार धडक दिली. या अपघातात मोरया भक्त शरद पुराणिक आणि मिलिंद पोफळे हे जखमी झाले. शरद पुराणिक यांच्या डोक्याला जबर मार लागला असून पुणे येथील खासगी रुग्णालयात त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली.

या अपघातामध्ये त्यांच्या मेंदूस जबर दुखापत झाली असून अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या नातेवाईकांची रुग्णालयाचा खर्च करण्याची आर्थिक परिस्थिती नसल्याने चिंचवड देवस्थानने याची जबाबदारी घ्यावी, अशी नातेवाईकांची मागणी केली आहे.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.