Bavdhan News : भर दिवसा घरातून 65 ग्रॅम वजनाचे दागिने अन साहित्य चोरीला

एमपीसी न्यूज – बावधन खुर्द येथून भर दिवसा घरफोडी करत चोरट्यांनी 65 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व साहित्य चोरून नेले आहे. ही घटना गुरुवारी (दि. 1) दुपारी तीन ते सायंकाळी सहा वाजताच्या कालावधीत मारिगोल्ड रोडवरील साई व्हिला या सोसायटीत घडली.

प्रसाद दयानंद शिवशेटे (वय 23, रा. बावधन खुर्द, ता. मुळशी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Hinjewadi News: एटीएम फोडताना तिघांना हिंजवडी पोलिसांनी केले अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर गुरुवारी दुपारी कुलूप लावून बंद होते. अज्ञात चोरट्याने दरवाजाचे कुलूप तोडून घरातील 65 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम, घड्याळ असा एकूण दोन लाख 94 हजारांचा ऐवज चोरून नेला. सायंकाळी फिर्यादी सहा वाजता घरी आले असता हा प्रकार उघडकीस आला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.