Bhosari : पीएमपीएमएल बस प्रवासात महिलेचे दागिने लंपास

एमपीसी न्यूज –  पीएमपीएमएलच्या चंदननगर ते येरवडा या बस प्रवासात एका महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र, डोरले असे 60 हजार रुपयांचे सोने लंपास केले. ही घटना 27 ऑगस्ट रोजी घडली.

याप्रकरणी नलिनी शंकरराव राख (वय 60, रा. चंदननगर) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

नलिनी या 27 ऑगस्ट रोजी चंदननगर ते येरवडा या दरम्यान पीएमपीएमएल बस प्रवास करत होत्या. पर्समधून मोबाईलवर घेतल्यानंतर त्यांच्या पर्सची चैन उघडी होती. अज्ञात चोरट्याने 60 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने व 200 रूपयांची रोकड चोरून नेली. भोसरी पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.