Pimpri Crime News : नेहरूनगर येथे घरातून 12 तोळे दागिने पळवले

एमपीसी न्यूज – नेहरूनगर येथील एका घरातून अज्ञात चोरट्यांनी तीन लाख रुपये किमतीचे 12 तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना जानेवारी 2022 ते 12 मे 2022 या कालावधीत घडली.

रामचंद्र कविचंद भाट (वय 55, रा. नेहरूनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घरात अज्ञात व्यक्तीने नकळत प्रवेश केला. घरातील बेडरूममधील लाकडी कपाटाचे लॉकर तोडून त्यातून सुमारे तीन लाख रुपये किमतीचे 12 तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.