Jhund film : नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’च्या प्रदर्शनाची ‘ही’ तारीख जाहीर

खुद्द 'बिग बी' यांच्याकडूनच प्रदर्शनाची तारीख जाहीर

एमपीसी न्यूज – बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका आणि नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘झुंड’ या चित्रपटाची सिने रसिक आतुरतेनं वाट पाहत आहेत. या बहुचर्चित चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अखेर जाहीर झाली आहे. येत्या 18 जून 2021 ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

खुद्द ‘बिग बी’ यांनी चित्रपट प्रदर्शनाची तारिख जाहीर केली आहे.

चित्रपटाच्या चित्रिकरणात अनेक व्यत्यय आले. त्यानंतर कोरोना आणि त्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे चित्रपटाचे चित्रिकरण लांबणीवर पडत होते. देशात अनलॉक सुरू होत गेला आणि चित्रपटाच्या चित्रिकरणास परवानगी देण्यात आली. त्यानंतर आता चित्रपटाची प्रदर्शनाची तारिख निश्चित करण्यात आली आहे.

_MPC_DIR_MPU_II

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी दोन वर्षा पूर्वीच या चित्रपटाची घोषणा केली होती. हा चित्रपट नागपूरचे निवृत्त क्रीडाशिक्षक विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित आहे. बारसे हे झोपडपट्ट्यांमधील मुलांना फूटबॉल शिकवतात.

या चित्रपटात या शिक्षकाची भूमिका अमिताभ बच्चन साकारणार आहेत. यापूर्वी चित्रपटाची प्रदर्शनाची तारिख 20 सप्टेंबर होती.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like