Crime News : म्हाळुंगे येथून जिओ टॉवरची बॅटरी चोरीला

एमपीसी न्यूज : चोरट्यांनी थेट जिओ टॉवरची बँटरी व केबल चोरून नेली आहे. हा प्रकार म्हाळुंगे येथील पडाळे चौक

येथे बुधवारी (दि.17) उघडकीस आला.

याप्रकरणी अमित प्रकाश भगत (वय 39 रा. खडकवासला) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी महाळुंगेतील पडाळे

चौकात  महाळुंगेनांदे रोडवरील जिओ टॉवरची  8 हजार रुपयांची बॅटरी व 8 हजार रुपयांचे पॉवर केबल असा एकूण  16 हजार रुपयांचा एवज चोरून नेला आहे.पुढील तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.