Pune – जंगली महाराज रस्त्यावर मनसेचे मोबाईल कंपन्यांविरोधात खळ्ळखट्याक आंदोलन

एमपीसी न्यूज – जंगली महाराज रस्त्यावर अनधिकृतपणे स्टेज उभारून जाहिरात करणा-या मोबाईल कंपन्यांविरोधात मनसे कार्यकर्त्यांच्या वतीने आज शुक्रवारी (दि.24) खळ्ळखट्याक आंदोलन करण्यात आले.

यावेळी मनसेचे शिवाजीनगर अध्यक्ष सुहास निम्हण, विनायक कोतकर, शंकर पवार, सतीश पाटोळे, उदय गडकरी, गोकुळ अडागळे, मुकेश खांडरे, योगेश शिंदे, नचिकेत टिकम, निखिल बाराते, प्रशांत नलावडे, दिनेश आमले, यश पढेर तसेच मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना मनसेचे शिवाजीनगर विभागाचे अध्यक्ष सुहास निम्हण म्हणाले यापुढे पुन्हा जर आम्हाला पादचारी मार्गावर साउंड, स्टेज, व मुली नाचताना दिसल्यास कोणाकडेही तक्रार करणार नाही तर मनसे स्टाईल खळ्ळखट्याक आंदोलन केले जाईल ह्या आंदोलनात जर कोणाचे काही नुकसान झाल्यास सर्वस्वी मोबाईल कंपन्या व प्रशासन जबाबदार असतील.

जंगली महाराज रस्ता हा स्मार्ट सिटीच्या अंतर्गत त्याचे रस्ते, पदपथ, पार्किंगची सोय करण्यात आली आहे. पदपथ मोठमोठाले करून रस्ता अतिशय अरुंद करण्यात आला आहे. ह्या पदपथाचा व पार्किंगचा सामान्य नागरिकांना उपयोग होत नसून.मोबाइल कंपन्या शनिवार आणि रविवार असे दोन्ही दिवस जंगली महाराज रोडवर अनधिकृत स्टेज उभारतात. त्यामध्ये गेम शो घेतात, बक्षीसे वाटतात. याचा फटका रस्त्यावरच्या वाहतुकीला बसतो, तसेच सामान्य नागरिकांनाही त्याचा त्रास होतो. त्यामुळेच मनसेने खळ्ळखटॅक आंदोलन केले. मोबाइल शॉपींच्या या कार्यक्रमांबाबत वाहतूक पोलिसांना तक्रारी देण्यात आल्या आहेत. तरीही याकडे दुर्लक्ष करण्यात आले त्यामुळे हे आंदोलन करण्यात आल्याचे मनसेने म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.