Pune : जेएनयू प्रकरणाचा पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांकडून निषेध

एमपीसी न्यूज – जेएनयू प्रकरणाचा पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांकडून आज निषेध करण्यात आला. विद्यार्थ्यांनी तब्बल दोन तास ठिय्या आंदोलन करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात घोषणाबाजी केल्या. 

पुणे विद्यापीठातील अनिकेत कॅन्टिनजवळ JNU मधील मारहाणीचा निषेध नोंदवण्यात आला. यावेळी या आंदोलनात राज्यमंत्री विश्वजीत कदम आणि विद्यापीठातील विविध संघटना सहभागी झाल्या.

दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (JNU ) संकुलात रविवारी झालेल्या हिंसक आंदोलनात रविवारी काही विद्यार्थी जखमी झाले. जेएनयूची अध्यक्ष आइशी घोषने या प्रकरणी तातडीने चौकशी सुरु करण्याची मागणी केली. तसेच आमच्यावर झालेला हल्ला पूर्वनियोजित होता असाही आरोप केला. या घटनेचे पडसाद पुण्यात उमटले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.