Nighoje : निघोजे येथील कंपनीतून 14 लाखांचे जॉब पार्ट चोरीला

एमपीसी न्यूज – निघोजे (Nighoje) येथील कल्याणी टेक्नोफोर्ज या कंपनीतून दोन चोरट्यांनी 14 लाख 33 हजार रुपये किंमतीचे पार्ट चोरून नेले. ही घटना 20 एप्रिल ते 22 एप्रिल या कालावधीत घडली.

अशोक चव्हाण, गोपाळ पाटील अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी कंपनीचे असिस्टंट मॅनेजर सागर सुरेश कुंभार (वय 32, रा. मोशी) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pune News : पोलिस अधिकार्‍याच्या 21 वर्षीय मुलाचा निर्घृण खून, पुण्यातील घटनेने खळबळ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या कंपनीत भोसरी आणि आंध्र प्रदेश येथील कंपन्यांमधून प्रक्रियेसाठी जॉब आले होते. त्यातील काही जॉब प्रक्रिया करून पूर्ण झाले होती.  प्रक्रिया पूर्ण झालेले 1200 जॉब आणि प्रक्रिया न झालेले 668 जॉब असे एकूण 14 लाख 33 हजार 652 रुपये किंमतीचे 1868 जॉब दोघांनी चोरून नेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस (Nighoje) तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.