Pimpri: शिवसेनेचे भर पावसात आमदार राम कदमांच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’

एमपीसी न्यूज – दहीहंडी उत्सावात मुलींबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजपचे आमदार व प्रवक्ते राम कदम यांचा राज्यभरातून निषेध केला जात आहे. पिंपरीत शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आज (शुक्रवारी)राम कदम यांच्या प्रतिमेला भर पावसात ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले.

पिंपरीतील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात  झालेल्या आंदोलनाला महिलांच्या संपर्कप्रमुख वैशाली सुर्यवंशी, शहर प्रमुख योगेश बाबर, शहरसंघटिका सुलभा उबाळे, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, मीनल यादव, नगरसेवक सचिन भोसले,  भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, आशा भालेकर, सुशीला पवार, शशिकला उभे, स्वरुपा खापेकर, अनिता तुतारे, युवराज कोकाटे, वसंत भोसले यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

‘राम कदम यांचे करायचे काय, खाली डोके वर पाय’, ‘भाजप सरकारचे करायचे काय खाली डोके वर पाय’ अशा जोरदार घोषणा राम कदम आणि सरकारच्या  विरोधात आंदोलकांनी दिल्या.

 काय केले होते वादग्रस्त वक्तव्य!

उद्या मला सांगितलेत की एखाद्या मुलीला प्रपोज केले आहे ती नाही म्हणते. तुमच्या आई वडिलांना समोर आणा ते जर म्हटले की मुलगी पसंत आहे तर तिला पळवून आणेन, असे वादग्रस्त वक्तव्य कदम यांनी केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.