Pune News : पुण्यातून व्हाईट हाऊसमध्ये हापूस रवाना

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रातील दर्जेदार आंबे आता सातासमुद्रापार म्हणजेच थेट व्हाईट हाऊसमध्ये पाठविण्यात आले आहेत. कोरोनाची आकडेवारी कमी झाल्यामुळे भारतातून अमेरीकेत आंब्यांची यंदा पुन्हा सुरू झाली आहे.

 

या आठवड्यात वॅशिंग्टन येथील आंबा विक्री प्रदर्शनात विविध प्रकारचे आंबे असलेली पेटी थेट अध्यक्ष जो बायडन यांना पाठविली आहे, याबाबतचे वृत्त एबीपी माझाने दिले आहे.कोरोनामुळे दोन वर्षांपासून आंबा निर्यात ठप्प होती.

 

रेनबो इंटरनॅशनल ही पुण्याची आंबा निर्यातदार कंपनी अमेरिकेत पाच प्रकारचे आंबे निर्यात करते.यामध्ये महाराष्ट्रातील केसर,हापूस, गोवा मानकूर, आंध्र प्रदेशातील हिमायत आणि बांगनपाली यांचा समावेथ आहे, असे रेनबो इंटरनॅशनलचे संचालक ए.एस.सी. भोसले यांनी सांगितले.सोमवारी हा आंबा अमेरीकेला पाठविऩ्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

रेनबो इंटरनॅशनल ही बारामती येथील कंपनी असल्याने बारामतीचे प्रतिनिधीत्व करणार्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्टिट करुन याबाबत आनंद व्यक्त केला.बारामतीच्या जळोची येथे रेनबो इंटरनॅशनलने पाठविलेला आंबा अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याकडे सुपुर्त केला जाणार आहे.अमेरिकेच्या राष्ट्राध्याक्षांना पाठविलेल्या आंब्यांमध्ये हापूस, केशर,गोव्यातील मानकूर आंब्यांचा समावेथ आहे, असे व्टिट सुप्रिया सुऴे यांनी केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.