Pcmc : जोग स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंना 8 सुवर्ण व 7 रौप्यपदक

एमपीसी न्यूज – पुणे जिल्हा क्रिडा परिषदेच्या वतीने आयोजित पिंपरी-चिंचवड (Pcmc) जिल्हा आंतरशालेय स्पर्धेत जोग स्पोर्ट्स अकॅडमीच्या मुलींनी 8 सुवर्ण तर 7 रौप्यपदक मिळवून स्पर्धेचे सांघिक विजेतेपद मिळविले. शौर्या यादव , प्रतिज्ञा नांदेडकर ईश्वरी घेमूड , ऋतुजा पवार् , अक्षरा भोसले, आर्या यादव , अनुष्का भालेकर, आदिती दौडकर या खेळाडूंनी सुवर्णपदक मिळविले.
Chinchwad : न घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्याची मागणी करत महिलेची बदनामी
आर्या कातोरे , गायत्री काणेकरी , श्रेया किटे , अन्वी लुगडे, समीक्षा चौधरी , श्रुष्टि वीरकर , नताशा कडाकणे या खेळाडूंनी रौप्यपदक प्राप्त केले.
सर्व विजयी खेळाडूंनां आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच दिनेश गुंड, आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर आदर्श गुंड, हार्दिक गुंड, रेणुका महाजन यांचे मार्गदर्शन मिळाले.