Pimpri: सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या अहमदनगर जिल्हा निरीक्षकपदी जोगदंड 

एमपीसी न्यूज – भारिप बहुजन महासंघ प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या अहमदनगर जिल्हा निरीक्षकपदी सम्यक विद्यार्थी आंदोलन पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष संतोष जोगदंड यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय नेते अँड.प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महेश भारतीय यांनी या निवडीबाबतचे पत्र दिले आहे. 

सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संतोष जोगदंड यांनी आरटीई अंतर्गत आर्थिक दुर्बल व वंचित घटकांना 25 टक्के राखीव कोट्यातुन शाळेमध्ये प्रवेश देण्या बाबत जनजागृती करून महत्व पटवून दिलेले आहे. मागासवर्गीय विध्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती व परीक्षा फी परताव्यासाठी पाठपुरावा करून न्याय मिळवून दिला आहे.

सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल घटकातील शालेय मुलींना-मुलांना मोफत दप्तर वाटप , वह्या वाटप असे शालेय साहित्य दरवर्षी मोफत देतात. भारतीय संविधान जनजागृतीसाठी शालेयस्तरावर भारतीय संविधान पुस्तकांचे वाटप करतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.