COVID-19 Vaccines : देशात जॉन्सन अँड जॉन्सनच्या तिसऱ्या लशीला मिळणार लवकरच परवानगी

एमपीसी न्यूज : कोरोना विरोधात लढण्यासाठी आता भारतात जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या लशीला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. या लसीवर आता अन्न आणि औषध प्रशासनाच्या (एफडीए) सल्लागारांमध्ये लवकरच चर्चा होणार आहे. 

अमेरिकन लस निर्मिती कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनने दावा केला आहे की, त्यांची लस ही अमेरिकेत 72 टक्के तर जगभरात 66 टक्के प्रभावी आहे. याच आधारे आता या लशीला भारतातही काही दिवसातच मंजुरी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे एफडीएकडून अमेरिकेच्या या तिसऱ्या लसीला अनुमती देण्याच्या निर्णयाच्या अगदी जवळ आहे.

या आधी जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने त्यांची लस ही 94 टक्के प्रभावी असल्याचे सांगितले होते. या लसीचा एकूण 44 हजार लोकांवर यशस्वी प्रयोग झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या या तिसऱ्या लसीकरणाला भारतात मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. अमेरिकेत याचा परिणाम चांगला दिसून आला आहे. तसेच आफ्रिकेतील सात देशांतही चांगला प्रभाव दिसून आला असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

अमेरिकेत सध्या 4.45 कोटी नागरिकांना फाइजर मोडेरनाद्वारे निर्मित लसीचा प्रत्येकी एक डोस देण्यात आला आहे. तर दोन कोटी लोकांना दुसरा डोसही देण्यात आला आहे. त्यानंतर आता जॉन्सन अँड जॉन्सन कंपनी आपल्या लशीबद्दल सांगितले की, येत्या आठवड्याभरात अमेरिकन सरकारकडे या लशीच्या इमर्जन्सी वापराची विनंती करण्यात येईल. त्यानंतर जगातल्या विविध देशांमध्येही ही प्रक्रिया पार पाडण्यात येईल. अमेरिकेत मंजुरी मिळाल्यानंतर याचे वितरण सुरु करण्यात येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.