Pune News : पुण्यात भारत बंद शांततेत, अनुचित प्रकार घडला नसल्याची सहपोलीस आयुक्तांची माहिती

एमपीसी न्यूज : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात विविध राजकीय पक्षांसह संघटनांनी पुणे शहरात ६ ते ७ ठिकाणी आंदोलन केले. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. सर्व ठिकाणी शांततेत आंदोलन पार पडल्याची माहिती सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिली आहे.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरात आज अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्यात आले होते. त्याशिवाय प्रत्येक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह कर्मचा-यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले होते.  शहरात सहा ते सात ठिकाणी झालेल्या आंदोलनात सहभागी झालेल्यांशी पोलिसांनी योग्य समन्वय साधला.

आंदोलनकर्त्यांकडून निवेदने स्वीकारणे,  एकाच जागेवर निर्देशने करण्यास परवानगी देण्यात आली होती. अलका टॉकीज चौक परिसरात विविध राजकीय पक्षांनी मिळून मोठे आंदोलन केले. त्याठिकाणी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून निवदेन स्वीकारले.  आंदोलन शांततेत पार पाडण्यासाठी सहपोली आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक हद्दीतील सहायक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी जबाबदारी पार पाडली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.