Pimpri News : पत्रकारांनाही पहिल्या टप्प्यात कोरोनाची लस द्यावी : बशीर सुतार 

एमपीसी न्यूज – पहिल्या टप्प्यात डाॅक्टर, नर्स, पोलीस, आरोग्य कर्मचारी या कोरोना योद्धयांना कोरोना लस देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हा निर्णय स्वागतार्ह आहे पण, पत्रकारांनाही पहिल्या टप्प्यात कोरोनाची लस द्यावी अशी मागणी पिंपरी चिंचवड शिवसेना कार्यालयाचे प्रमुख बशीर सुतार यांनी केली आहे. 

बशीर सुतार यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मागणी केली आहे. पत्रात ते म्हणतात, पहिल्या टप्प्यातील लसीकरणात माध्यम प्रतिनिधींचाही समावेश करावा. कोरोना योद्धयांना मिळणाऱ्या सुविधा पत्रकारांना मिळत नाहीत. पत्रकारही स्वतःचा जीव धोक्यात घालून वृत्त संकलनाचे काम प्रामाणिकपणे करीत आहेत. त्यांच्या या कामामुळे नागरिकांना अनेक बातम्या पाहायला आणि वाचायला मिळतात.

कोरोना संकट काळात काही पत्रकांरांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे कोरोना लस उपलब्ध झाल्यास पहिल्या टप्प्यात पत्रकारांनाही ही लस द्यावी अशी मागणी सुतार यांनी आपल्या पत्रात केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.