Journey of MPC News : जाणून घ्या… कसा झाला ‘एमपीसी न्यूज’चा 14 वर्षांचा प्रवास?

एमपीसी न्यूज – पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील पहिले व अग्रगण्य सिटी न्यूज पोर्टल असलेल्या mpcnews.in चा जन्म कसा झाला, यशाची नवनवी शिखरे पादाक्रांत करताना कोणत्या अग्निपरीक्षांना सामोरे जावे लागले, एकूणच एमपीसी न्यूजची 14 वर्षांची वाटचाल (Journey of MPC News) कशी झाली, हे जाणून घ्या एमपीसी न्यूजचे संस्थापक विवेक इनामदार व हृषीकेश तपशाळकर यांच्या तोंडून…
देवदत्त फोटोग्राफी स्कूलच्या ‘मला काही सांगायचंय…’ या मालिकेत नामवंत छायाचित्रकार व मुलाखतकार देवदत्त कशाळीकर यांनी विवेक इनामदार व हृषीकेश तपशाळकर यांची मुलाखत घेतली. एमपीसी न्यूजची यशोगाथा… पत्रकारांनी सुरू केलेले आणि चालविलेले मीडिया हाऊस… यापूर्वी आपल्याला माहीत नसलेल्या अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी सोबतचा व्हिडिओ आवर्जून पाहावा.