Pune News : ‘ओमायक्रॉन’च्या पार्श्वभूमीवर जम्बो कोविड सेन्टर रेडी पोझिशन मध्ये

एमपीसी न्यूज : ओमायक्रॉन’च्या पार्श्वभूमीवरती महापालिकेने जम्बो कोबड सेंटर पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टिकोनतून पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. जम्बो कोविड सेंटरच्या व्यवस्थेची पाहणी महापालिकेकडून नुकतीच करण्यात आली आहे. आणि वेळ पडल्यास जम्बो कोविड सेंटर सुरू करण्यासाठी ‘रेडी पोझिशन  वरती ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

ओमायक्रॉन’चे बाधित सापडण्याआधीच अधिकाऱ्यांनी शनिवारी शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (सीओईपी) आवारातील जम्बो कोविड रुग्णालयाची पाहणी केली.

महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. आशीष भारती आणि अन्य विभाग प्रमुखांनी ही भेट दिली. या रुग्णालयातील सर्व साहित्य आणि सद्यस्थितीचा आढावा घेऊन ‘रेडी पोझिशन’ मध्ये ठेवण्याच्या संबधित विभागांना सूचना देण्यात आल्याचे डॉ. भारती यांनी सांगितले.

करोनाच्या पहिल्या लाटेवेळी राज्य सरकार आणि महापालिकेने 800 आसन क्षमतेचे जम्बो कोविड रुग्णालय उभारले. या रुग्णालयात यावर्षी जुलैपर्यंत साडेसहा हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार करण्यात आले. दुसऱ्या लाटेनंतर रुग्णसंख्या आटोक्‍यात आल्यानंतर यावर्षी 3 जुलैला येथील उपचार सुविधा बंद करण्यात आली आहे. परंतू स्टॅबिलिटी रिपोर्ट आणि करोनाचे रुग्ण सापडत असल्याने रुग्णालयाला मुदतवाढ देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.