Junnar : पुणे जिल्हा परिषदेतील गटनेत्या आशा बुचके यांची शिवसेनेतून हकालपट्टी

एमपीसी न्यूज – पुणे जिल्हा परिषदेतील शिवसेनेच्या गटनेत्या आशा बुचके यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

शिरुर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव यांचा पराभव झाला. हा पराभव पक्षाच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. निवडणुकीत पक्षाच्या विरोधात काम करणा-या नेत्यांविरोधात शिवसेनेने कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेतील गटनेत्या आशा बुचके यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

आशा बुचके या 2002 पासून जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत. त्यांनी 2009 आणि 2014 मध्ये जुन्नर मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढविली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता. आता लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

त्याचबरोबर शिरूरचे जिल्हाप्रमुख राम गावडे यांना पदावरून दूर करण्यात आले आहे. त्यांच्या जागी जिल्हा परिषद सदस्य माऊली कटके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात तालुकाप्रमुख नेमले आहेत. माऊली खंडागळे (जुन्नर), अरुण गिरे (आंबेगाव), रामदास धनवटे (खेड-आळंदी), गणेश जामदार (शिरूर, 39 गावे)यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

HB_POST_END_FTR-A2
You might also like