Junnar : जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांचे निधन

एमपीसी न्यूज – जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार वल्लभशेठ दत्तात्रय बेनके  यांचे दिर्घ (Junnar) आजाराने काल रात्री निधन झाले. ते 74 वर्षांचे होते.आज  ( सोमवार दि .12) सायंकाळी चार वाजता हिवरे बुद्रुक(ता. जुन्नर ) येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, पूत्र आमदार अतुल, डॉ.अमोल, अमित, दोन भाऊ, तीन बहिणी,सुना,नातवंडे असा परिवार आहे. बेनके यांच्या निधनाने जुन्नर तालुक्यात शोककळा पसरली आहे.

Dehu Alandi : देहू, आळंदी मिळून नवीन महानगरपालिका करण्याबाबत चाचपणी – उपमुख्यमंत्री अजित पवार 

बेनके हे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जायचे. बेनके यानी जुन्नर विधानसभा मतदार संघातून 1985 ते 2009 या कालावधीत सलग सहावेळा निवडणूक लढवली होती. त्यातील चार वेळा ते विजयी झाले होते.कुशल संघटक आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असणारे नेते असा त्यांना लौकीक होता.
प्रकृतीमुळे 2014 पासून ते सक्रिय राजकारणापासून दूर होते.त्यांच्या प्रकृतीत अनेकदा चढउतार झाले.  त्यांच्यावर त्यांचे पुत्र डॉ. अमोल, हृदयरोग तज्ञ डॉ.सदानंद राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू होते. दीर्घ आजारामुळे त्यांचे अवयवही निकामी होत गेले. त्यांची पत्नी, मुले,सुना यांनी मागील दहा वर्षे त्यांची सुश्रुषा केली.आज अखेर रात्री चाकण येथील खासगी रूग्णालयात त्यांची प्राणज्योत  (Junnar) लवली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.