Junnar : किशोर दांगट यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती

एमपीसी न्यूज- प्रसिद्ध उद्योजक किशोर दांगट यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले.

यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. किशोर दांगट हे मूळचे जुन्नर तालुक्यातील आहेत. उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने ते मुंबईत राहत असले तरीही जुन्नर तालुक्यातील राजकारणात किशोर दांगट यांचा शब्द अंतिम मानला जातो. यापूर्वी त्यांनी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे खजिनदार म्हणून तर प्रदेश कार्यकारिणीमध्ये सहसचिवपदाची जबाबदारी सांभाळली होती.

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचे ते अतिशय विश्वासु सहकारी म्हणून ओळखले जातात. जिल्हा तसेच राज्यातील अनेक आमदार खासदार यांच्या सोबत त्यांचे सौदार्हाचे संबंध आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.