Junnar : चार महिन्याच्या चिमुरडीला उचलून नेणारा तो बिबट्या अखेर जेरबंद

एमपीसी न्यूज- जुन्नर तालुक्यातील खानेवाडी येथील धनगर वाड्यावरून चार महिन्याच्या चिमुरडीला पळवून नेणारा बिबटा अखेर वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. या बिबट्याने 23 जानेवारीच्या मध्यरात्री कल्याणी सुखदेव झिटे या चार महिन्याच्या बालिकेला फरपट ओढत नेले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी या चिमुरडीचा मृतदेह सापडला होता.

या घटनेनंतर खानेवाडी येथील धनगर वाड्यापासून काही अंतरावर चार ठिकाणी पिंजरे लावले होते. 26 जानेवारीच्या पहाटे पाच वाजता हा बिबट्या या पिंजऱ्यात जेरबंद झाला. सध्या त्याला माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात दाखल करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.