Junnar News: जुन्नर तालुका मित्र मंडळ, अलायन्झ ग्रुप ऑफकडून जुन्नरमधील ‘सीसीसी’ सेंटरसाठी वैद्यकीय साहित्य

जुन्नर तालुका मित्र मंडळ ही जुन्नर तालुक्यातून नोकरी व्यवसाय निमित्त पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात वास्तव्यास असणाऱ्या लोकांची संघटना आहे.

एमपीसी न्यूज – जुन्नर तालुक्यातून नोकरी व्यवसायानिमित्त पुणे शहरात वास्तव्यास असणाऱ्या जुन्नर तालुका मित्र मंडळ व अलायन्झ ग्रुप ऑफ पिंपरी-चिंचवड यांनी जुन्नर मधील लेण्याद्री या ठिकाणी असणाऱ्या कोविड केअर सेंटरमधील रुग्ण व वैद्यकीय कर्मचारी यांच्यासाठी आवश्यक असणारे वैद्यकीय साहित्य दिले आहे. त्यात पीपीइ किट, मास्क, सॅनिटायझर, ग्लोज असे साहित्य देणगी स्वरूपात दिले आहे.

जुन्नर तालुका मित्र मंडळ ही जुन्नर तालुक्यातून नोकरी व्यवसाय निमित्त पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात वास्तव्यास असणाऱ्या लोकांची संघटना आहे. जुन्नर तालुक्यात अनेक सामाजिक व सेवाभावी उपक्रमांमध्ये संघटना आपले सक्रिय योगदान देत असते.

जुन्नर तालुका मित्र मंडळ व अलायन्झ ग्रुप ऑफ पिंपरी-चिंचवड यांच्या सहयोगाने लेण्याद्री या ठिकाणी असणाऱ्या कोविड सेंटरमधील रुग्ण व वैद्यकीय कर्मचारी यांच्यासाठी आवश्यक असणारे साहित्य देण्यात आले.

त्यात 78 पीपीइ किट, 2500 मास्क, 50 लिटर सॅनिटायझर, 30 लिटर हँडवॉश, 19 respiratory veporiser machine, 1200 हँड ग्लोज, 300 बफिन कॅप, 20 स्प्रे बॉटल असे एकूण 1,05,000.00 किमतीचे कोविड प्रतिबंधक सुरक्षा साहित्य देणगी स्वरूपात दिले.

जुन्नर तालुक्याचे तहसीलदार हनुमंत कोळेकर, तालुका गटविकास अधिकारी हेमंत गरीबे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश गोडे हे प्रशासकीय अधिकारी तसेच जुन्नर तालुका मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर ढोमसे, समन्वयक अण्णासाहेब मटाले, विजय ढगे,संजय गुंजाळ, दीपक सोनवणे, योगेश आमले, इंद्रजित पाटोळे, अ‍ॅड महेश गोसावी, प्रदीप शिंदे, विशाल देवकर, अक्षय सोनवणे, प्रणव बोडके, राहुल वाळुंज उपस्थित होते.

यासाठी डॉ. गणेश सोनवणे यांनी पुढाकार घेतल्याबद्दल मंडळाच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले. गोळेगावच्या पोलीस पाटील कविता राजेश बिडवई यांनी सर्वाचे आभार मानले.

निधी संकलनकामी अण्णासाहेब मटाले, योगेश आमले, दीपक सोनवणे, नवनाथ नलावडे यांनी परिश्रम घेतले. मंडळाचे कार्याध्यक्ष रोहित खर्गे, सचिव अ‍ॅड. संतोष काशिद, उल्हास पानसरे, अमोल बांगर, मिननाथ सोनवणे, सुनील पाटे यांनीही सहकार्य करून उपक्रमास प्रोत्साहन दिले. तसेच या उपक्रमास योगदान देत हातभार लावणाऱ्या सर्व सभासदांचे अध्यक्ष प्रभाकर ढोमसे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.