Junnar News: सरपंच, उपसरपंचाच्या त्रासाला कंटाळून शिपायाची आत्महत्या, ग्रामपंचायतमधेच घेतला गळफास

एमपीसी न्यूज: जुन्नर तालुक्यातील अहिनवेवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालयात एका शिपायाने गळफास घेऊन आत्महत्या केली. सरपंच आणि उपसरपंचाच्या मानसिक छळाला कंटाळून त्याने हे पाऊल उचलले असून माहिती समोर आहे. ग्रामपंचायत कार्यालयातच आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. प्रकाश शिवराम गोंदे (वय 47) असे आत्महत्या केलेल्या शिपायाचे नाव आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मयत प्रकाश त्यांच्या खिशात दोन चिठ्ठ्या मिळाले आहेत. या चिठ्ठीवरून ओतूर पोलिस ठाण्यात त्यांच्या पत्नी नंदा गोंदे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार ओतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी मध्ये दिलेल्या माहितीनुसार प्रकाश गोंदे यांना प्यारालीसीसचा त्रास होता. त्यामुळे काम करताना त्यांना अडचणी येत होत्या. या कारणावरून सरपंच आणि उपसरपंच त्यांना नेहमी अपमानास्पद वागणूक देत होते. प्रकाश यांनी उपचारासाठी आणि औषध उपचारासाठी सरपंच आणि उपसरपंच यांच्याकडे भत्त्याची मागणी केली होती. परंतु देण्यास नकार दिल्याने आत्महत्या करत असल्याचे त्यांनी चिठ्ठीत नमूद केले आहे. ओतूर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.