Junnar News : मंथन फाउंडेशनचा जुन्नरमध्ये संवेदनशील मुलांसाठी स्तुत्य उपक्रम

एमपीसी न्यूज – मंथन फाउंडेशन व वायआरजी केअर यांच्या संयुक्त विद्यमाने एचआयव्हीसह जगणाऱ्या तसेच एचआयव्ही नसलेल्या मुलांसाठी स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

जुन्नरमधील शासकीय मुलींचे वसतिगृह याठिकाणी बुधवारी (दि. 17) हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमात मुलं व त्यांच्या पालकांना मार्गदर्शन केले तसेच विविध खेळ घेण्यात आले.

मंथन फाउंडेशनच्या अध्यक्षा आशा भट्ट यांनी उपस्थितांना संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. एचआयव्ही संक्रमित व्यक्तींचे हक्क, अधिकार व जबाबदारी याबद्दल माहिती दिली. मुलांना यापुढे देखील मदत करण्यात येईल, असे त्यांनी नमूद केले.

मंथन फाउंडेशन ॲक्सेलरेट प्रकल्पाअंतर्गत 0 ते 18 वयोगटातील मुलांसाठी सामजिक संस्थांच्या सहकार्याने एचआयव्ही सह जगणाऱ्या मुलांचा, त्यांचे पालक, भावंडं, मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करत आहे. समाजातील भेदभाव, एचआयव्ही व्यक्तीकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा यासाठी संस्था खेड, आंबेगाव व जुन्नरमध्ये कार्यरत आहे.

कार्यक्रमासाठी मंथन फाउंडेशन अध्यक्षा आशा भट्ट, मनीषा परदेशी, अर्चना पवार, रोशन गाडेकर, कविता परदेशी, मुग्धा ठाकूर देसाई, रेखा डाळिंबे, रोहिणी फटांगडे, संगीता मुरादे आदी उपस्थित होते. दीपक निकम, डॉ. सुनील पवार, ज्ञानेश कुटे, हनुमंत शिंदे, रंजना कदम, सुनील आमले, सीमा टाकळकर यांनी कार्यक्रम पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.

मंथन फाउंडेशनच्या अर्चना पवार यांनी पालक व मुलांसाठी खेळ घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.