Junnar: ‘त्यांनी’ दिला आजी-आजोबांना मोफत चौपाई काठीचा आधार!

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील समाजप्रेमी आप्पा प्रतिष्ठान व रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने जुन्नर तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांना रविवार (दि 8) रोजी मोफत चौपाई काठी वाटप समारंभ संपन्न झाला.

या सामाजिक संस्थांच्या वतीने ज्येष्ठांसाठी राबविण्यात येणा-या उपक्रमामध्ये एका नवीन उपक्रमाची भर पडली असून तळेगाव दाभाडे नव्हेतर मावळच्या बाहेर जाऊन जुन्नर तालुक्यातील शिवनेर प्रतिष्ठान संचालित राजाराम पाटील ज्येष्ठ नागरिक आधार केंद्र या वृध्दाश्रमातील आजी आजोबांना मदतीचा हात दिला.

याप्रसंगी तळेगाव दाभाडे येथील समाज प्रेमी आप्पा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे, रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे अध्यक्ष गणेश काकडे, महाराष्ट्र राज्य नोटरी असोसिएशनचे उपाध्यक्ष अॅड मच्छिंद्र घोजगे, तळेगाव दाभाडे प्रेस क्लबचे संस्थापक व ज्येष्ठ पत्रकार विलास भेगडे, तळेगाव शहर पत्रकार संघाचे सचिव अतुल पवार, स्वानंद खांडगे, प्रसिद्ध निवेदक अनिल धर्माधिकारी, कैलास काळे, मिलिंद शेलार, शिवनेर प्रतिष्ठानचे संचालक संदीप पानसरे, दशरथ जांभूळकर, लक्ष्मण मखर, पांडुरंग पोटे, बाळासाहेब शिंदे यांच्यासह समाजप्रेमी आप्पा प्रतिष्ठान व रोटरी क्लबचे पदाधिकारी व सदस्य धिकारी व सदस्य उपस्थित होते.

रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे माजी अध्यक्ष तसेच मावळ नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक व न्याय व विधी तज्ञ अॅड मच्छिंद्र घोजगे यांची महाराष्ट्र राज्य नोटरी असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.