Junnar : शिकारीच्या शोधात आलेले दोन बिबटे विहिरीत पडले ; जुन्नर तालुक्यातील भटकळवाडी येथील घटना

एमपीसी न्यूज- शिकारीच्या शोधात आलेले दोन बिबटे जुन्नर तालुक्यातील भटकळवाडी येथे बोरी येथील एका शेतात असलेल्या विहिरीत पडले. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच वनविभाग व माणिकडोह बिबट निवारा केंद्रातली रेस्क्यू टीमने धाव घेत या बिबट्यानं बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.

शुक्रवारी रात्री भक्ष्याच्या शोधात असलेले दोन बिबटे बोरी येथील बबन विष्णु लेन्डे यांच्या विहिरित पडले. सकाळी लेंडे हे शेतात आल्यावर त्यांना बिबट्याच्या गुरगुरण्याचा आवाज आला. त्यांनी विहिरीत पाहिले असता दोन बिबटे विहिरीत पडले असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. बिबटे जिवंत असून त्यांना विहिरीतून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.