BNR-HDR-TOP-Mobile

Junnar : अज्ञात वाहनाच्या धडकेने मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या तीन महिलांचा जागीच मृत्यू

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज- मॉर्निंग वॉकसाठी फिरायला गेलेल्या महिलांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने या अपघातामध्ये तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज, बुधवारी पहाटे साडेपाच ते सहाच्या दरम्यान अहमदनगर – कल्याण महामार्गावर (जुन्नर) उदापुर जवळ घडला.

मीराबाई सुदाम ढमाले, कमलाबाई महादू ढमाले, सगुणाबाई बबन गायकर अशी या दुर्दैवी महिलांची नावे आहेत.

या महिला अहमदनगर – कल्याण महामार्गावर उदापूरच्या दिशेने चालत निघाल्या होत्या. हॉटेल कुकुडु कुक समोर या वाहनाने धडक दिली. अपघातानंतर चालक वाहनासहित घटनास्थळावरून पसार झाला. मीराबाई ढमाले या विद्यमान जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले यांच्या मातोश्री आहेत. ओतूर पोलीस पुढील तपास करीत आहेत

HB_POST_END_FTR-A4

.