Jyotiraditya Hospitalized: कोरोनाची लक्षणे आढळल्याने ज्योतिरादित्य सिंधिया व त्यांच्या मातोश्री रुग्णालयात

Jyotiraditya Hospitalized: Jyotiraditya Scindia and his mother in hospital due to corona symptoms कोरोना चाचणीच्या अहवालाची प्रतीक्षा

एमपीसी न्यूज – भाजपा नेते ज्योतिरादित्य सिंधिया आणि त्यांची आई यांना तब्येत बिघडल्यामुळे दिल्लीच्या साकेत येथील मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांना कोविड 19 सारखी लक्षणे आढळली आहेत. दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या कोविड 19 चाचणीचा अहवाल येणे बाकी आहे.

ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले की, त्यांना आणि त्यांच्या आईला घसा खवखवणे आणि ताप आला होता. त्यानंतर ज्योतिरादित्य सिंधिया आणि त्यांची आई यांना डॉक्टरांच्या सांगण्यावरून सोमवारी साकेत येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

आज, दुसऱ्या दिवशी त्यांची तब्येत सुधारत आहे. तथापि, कोविड 19 चा चाचणी अहवाल अद्याप उपलब्ध नाही. त्यांना कोरोनाची बाधा झाली आहे अथवा नाही, हे स्पष्ट झालेले नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.