Alandi : आळंदीमध्ये के. के. निकम यांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा संपन्न
एमपीसी न्यूज : आळंदी (Alandi) येथील रसिकलाल धारिवाल सभागृह येथे खंडेराव निकम यांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा तसेच त्यांच्या जीवन चरित्रावर आधारित कर्मयोगी या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा व कै. श्रीमती पार्वतीबाई कुंडलिकराव निकम सामाजिक प्रतिष्ठानचा उदघाटन समारंभ मंगळवार 29 नोव्हेंबर रोजी संपन्न झाला. के. के. निकम यांनी नुकतीच वयाची 81 वर्ष पूर्ण केली आहेत.
त्यांनी 50 वर्षाच्या शैक्षणीक क्षेत्रात विविध पदांवर काम केले आहे पुणे जिल्हा शिक्षण मंडळात त्यांनी 1963 साली बोरी (ता.जुन्नर) येथे उपशिक्षक म्हणून संस्थेत नोकरीस लागले. तद्नंतर मुख्याध्यापक, संस्थेचे सहाय्यक सचिव, उपसचिव व अध्यक्ष प्रतिनिधी अशा विविध पदांवर त्यांनी संस्थेत प्रभावी काम केले आहे. सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा तसेच त्यांच्या जीवन चरित्रावर आधारित कर्मयोगी या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा व कै. श्रीमती पार्वतीबाई कुंडलिकराव निकम सामाजिक प्रतिष्ठानचा उदघाटन समारंभ या निमित्ताने विरोधी पक्ष नेते अजित पवार, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार दिलीप मोहिते पाटील, शांतिब्रम्ह मारुती कु-हेकर महाराज, नारायण महाराज जाधव यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
यावेळी आमदार अतुल बेनके, सहस्त्र चंद्रदर्शन (Alandi) सोहळ्याचे अध्यक्ष देवदत्त निकम, खासदार अशोक मोहळ उपस्थित होते. तसेच, यावेळी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरास सदिच्छा भेट दिली.
Todays’s Horoscope 30 November 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य