BNR-HDR-TOP-Mobile

Nigdi : प्राधिकरणातील हॉटेल रागामध्ये खमंग आणि चटकदार कबाब अँड करी फेस्टिव्हल

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज- आसेतुहिमाचल अशा या आपल्या भारतात अनेक राज्यांचा समावेश आहे. जसे त्या प्रत्येक ठिकाणचे निसर्गसौंदर्य वेगळे, चालीरिती वेगळ्या, तिथे बोलली जाणारी भाषा वेगळी, पेहराव वेगळा त्याचप्रमाणे तिथली खाद्यसंस्कृतीदेखील वैशिष्ट्यपूर्ण असते. साहजिकच विभागानुसार भारतीय खाद्यपदार्थांचे अनेक प्रकार असतात. पण साधारणपणे करी किंवा रस्सा हा सगळीकडे असतोच. त्यात समाविष्ट असणारे घटक प्रत्येक ठिकाणी वेगळे असतात. समुद्रालगतच्या ठिकाणी त्यात नारळाचा वापर केला जातो. पंजाबी पदार्थात कांदा, टॉमेटो, पनीर असते तर लखनवी, मोगलाईमध्ये राजेशाही सुकामेवा, खवा यांचा मुबलक वापर होतो. आणि आता तर काय भारतीय करीला आंतरराष्ट्रीय मान्यतादेखील मिळाली आहे. ब्रिटीशांच्या खान्यात करी ही त्यांची स्पेशालिटी डिश मानली गेली आहे. पिंपरीचिंचवडमधील खवय्यांना आता वैशिष्ट्यपूर्ण करी आणि कबाब या खास पदार्थांच्या हटके चवीची ओळख करुन देऊन त्याची चटक लावण्यासाठी प्राधिकरण येथील हॉटेल रागामध्ये कबाब अँड करी फेस्टिव्हल सुरु झाला असल्याची माहिती हॉटेल रागाचे राहुल गावडे यांनी दिली.

उद्या म्हणजे शनिवारी मुस्लिम बांधवांचा पवित्र सण रमजान ईद आहे. महिनाभराचे रोजे राखलेल्यांच्या उपवासाची साग्रसंगीत सांगता व्हावी या उद्देशाने येथे चिकन, मटण, फिशच्या अनेकविध रुचकर डिशेस तयार करण्यात येत आहेत. कबाब आणि टिक्का या प्रकारात अनेक विशेष डिशेस येथे या फेस्टिव्हलच्या निमित्ताने खवय्यांची टेस्ट पूर्ण करण्यासाठी तयार करण्यात आल्या आहेत. फिरंगी तंदुरी चिकन ही त्यातली एक डिश तर मस्ट ट्राय या प्रकारातील आहे. बाहेरुन मसालेदार चिकन आणि आत स्पेशल स्टफिंग आणि हे सगळं तंदूरमध्ये भाजलेले. आहाहा खरोखरच अद्वितीय अशीच ही डिश आहे. स्टार्टरमधील आणखी डिशेस आहेत, मुर्ग आलिशान कबाब, आत चीज भरलेला मुर्ग मलमल कबाब, लाजवाब चवीचा मुर्ग लाजवाब टिक्का, मुर्ग खस्ता कबाब आणि स्पेशल निहारी मुर्ग टिक्का.

तसेच मटणामध्ये बोटी कबाब आणि मटण बर्रा कबाब हा एक वेगळा पदार्थ येथे आपल्यासाठी खास तयार करण्यात येत आहे. मटण चॉप्सना स्पेशल मसाल्याचे कोटींग लावून ते तंदूरमध्ये खमंग भाजून तयार केलेले आहेत. मत्स्यप्रेमींसाठी खास तंदुरी झिंगा रसिला आणि माही टिक्का लाहोरी येथे उपलब्ध आहे. आणि शाकाहारी खवय्यांनी नाराज होण्याचे अजिबात कारण नाही. कारण त्यांच्यासाठी मलई व्हेज शीग, पनीर तिरंगा, पनीर खस्ता कबाब आणि वेगवेगळ्या भाज्यांच्या साथीने तंदूरमध्ये खरपूस भाजलेले तंदूर स्टफ्ड मश्रूम उपलब्ध आहे.

करी प्रकारात देखील चिकन, मटण, फिश आणि शाकाहारी असे अनेक पर्याय या फेस्टिव्हलमध्ये आहेत. यातील सगळ्यात हटके प्रकार म्हणजे बनी चाव ही पाव आणि मटणापासून तयार करण्यात येणारी आफ्रिकन डिश. खिमा पावासाठी वापरला जाणारा वरुन कुरकुरीत आणि आतून लुसलुशीत असा पाव आणि त्यात आता भरलेली खमंग आणि टेस्टी अशी करी. ही खाताना वरचा कुरकुरीत पाव आतला टेस्टी रस्सा यांचा असा काही मिलाफ होतो की बस्स रे बस्स…


तसेच पोस्तो तंगडी मसाला ही मोहरीच्या स्वादाची बंगाली डिश, चिकन राजधानी हे खास मोगलाई पद्धतीचे राजेशाही चिकन आणि आपली खास देसी चिकन करी येथे उपलब्ध आहे. मटणामध्ये मटण चॉप्स करी आणि पारशी पद्धतीची बटाट्याच्या सळ्यांचा समावेश असलेली सल्ली बोटीदेखील येथे उपलब्ध आहे.

फिशमध्ये मच्छी करी आणि प्रॉन्स कालवण आहे. तसेच शाकाहारी लोकांसाठी सब्ज कुर्मा आणि शाकाहारी लोकांना मांसाहारी पद्धतीच्या चवीची आठवण करुन देणारे पनीर मुसल्लम येथे मिळणार आहे असे विशाल यादव यांनी सांगितले.

सो… थोड्याश्या पावसाने वातावरणात आलेल्या थोड्याश्या गारव्याचा आनंद मांसाहारी खाद्यपदार्थांच्या संगतीने लुटायचा असेल तर तुम्हाला हॉटेल रागाच्या कबाब अँड करी फेस्टिव्हलला लवकरात लवकर भेट द्यायलाच हवी. पुढील साधारणपणे महिनाभर हा फेस्टिव्हल सुरु राहणार असल्याचे हॉटेल रागाचे राहुल गावडे यांनी या निमित्ताने खास सांगितले.

 

.

HB_POST_END_FTR-A1
.