Kabaddi Competition News : ‘ जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धांसाठी प्रवेश अर्ज सादर करा’

पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे आवाहन

एमपीसीन्यूज : पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने 32 वी किशोर व किशोरी गट आणि 47 वी कुमार व कुमारी गट जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धांसाठी 10 ते 15 फेब्रुवारी या कालावधीत इच्छुक संघानी प्रवेश अर्ज सादर करावेत, असे आवाहन पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह मधुकर नलावडे यांनी कळवले आहे.

प्रवेश अर्ज पीडीएफ स्वरूपात व्हाटसअपवर पाठविण्यात येणार आहेत. या अर्जाची प्रिंट काढून किशोर व कुमार गटाच्या दोन्ही वेग वेगळ्या फाईल करून पुणे जिल्हा कबड्डी असोशिएसनच्या कार्यालयात जमा कराव्यात.

प्रवेश अर्जासोबत खेळाडूंचे वयाबाबतचे पुरावे जोडावेत. किशोर किशोरी गटासाठी जन्मतारीख 30 एप्रिल 2005 नंतरचा जन्म व वजन 55 किलो अशी अट आहे. कुमार गट मुलांसाठी 30 एप्रिल2001 नंतरचा जन्म आणि 70 किलो वजन, कुमारी गट मुलींसाठी 30 एप्रिल 2001 नंतरचा जन्म व वजन 65 किलो अशी अट आहे.

या दोन्ही स्पर्धेच्या तारखा व ठिकाण नंतर कळविण्यात येणार आहे. स्पर्धेचे प्रवेश अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख 10 ते 15 फेब्रुवारी 2021 असून हे अर्ज सायंकाळी 6 ते रात्री 9 या कालावधीत कार्यालयात जमा करायचे आहेत.

15 फेब्रुवारी 2021 रोजी रात्री 9 नंतर आलेल्या प्रवेश अर्जाचा विचार केला जाणार नसल्याचे पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह नलावडे यांनी कळवले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.