Lonavala News: राहुल शेट्टी हत्या प्रकरणी कादर इनामदारला अटक

एमपीसी न्यूज: शिवसेनेचे माजी शहरप्रमुख राहुल  शेट्टी यांच्या हत्याप्रकरणी फरार असलेला संशयित आरोपी कादर नजीर इनामदार (वय 38, रा. भांगरवाडी, लोणावळा) याला सोमवारी अटक करण्यात आली. 

_MPC_DIR_MPU_II

    लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार 26 आँक्टोबर रोजी सकाळी 9.30 वाजता जयचंद चौकात येवले चहाच्या दुकानासमोर राहुल शेट्टी यांच्यावर घातक शस्त्राने वार व पिस्तूलमधून गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी मुख्य मारेकरी इब्राहिम खान, सुत्रधार मोबिन इनामदार यासह सहा जणांना आतापर्यत अटक करण्यात आली आहे तसेच हत्येकरिता वापरण्यात आलेली हत्यारे व सहयोगी हत्यारे देखील ताब्यात घेण्यात आली आहेत. या हत्या प्रकरणातील सादिक बंगाली हा अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू असल्याचे पवार यांनी सांगितले. पुर्ववैमनस्यांतून माोबिन इनामदार यांनी इतर आरोपींशी संगनमत करून खूनाचा हा कट रचला होता तर इब्राहिम याने हल्ला करून कटाला मृत स्वरुप दिले होते.

    पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डाॅ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक विवेक पाटील, लोणावळा विभागाचे सहायक पोलीस अधिक्षक नवनित काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली शहरचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार या प्रकरणाचा तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like