Kaivalya Nagare : अवघ्या अडीज वर्षाच्या कैवल्याने केला ‘इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड’

एमपीसी न्यूज : हल्ली लहान मुलांना समजायला लागत नाही, तोवर त्याच्या हातात मोबाईल दिला जातो. आणि त्यामुळे बाळ केवळ मनोरंजन विश्वात रंगतो. मोठा होत असताना त्याचे मन अभ्यासापेक्षा युट्युब, इंस्टासारख्या रिल्समध्ये जास्त गुंतते. या शिकवणीला मात देत आळंदीमधील कैवल्य नांगरे या अवघ्या अडीज वर्षाच्या मुलाने इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये (Kaivalya Nagare) आपले स्थान पटकावले आहे.

कैवल्यच्या या बुद्धीचातुर्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. कारण ज्या वयात बाळ बोलू शकत नाही, त्या वयात कैवल्य कोणत्याही शाळेत न जाता सर्व प्रकारचे रंगांचे नावे तसेच रंग ओळखणे इंग्लिश मधील अल्फाबेट मोठी व छोटी लिपी दोन्ही तसेच लेटर्स ऑफ अल्फाबेट, सर्व गाड्यांची नावे, आकार ओळख, एक ते वीस अंक ओळख, मराठी व इंग्रजी कविता, फळे भाजी प्राणी पक्षी या सर्वांची इंग्रजी नावे व चित्र ओळख अगदी अचूक सांगत आहे.

RBI Repo Rate : मोठी बातमी! लोनसह सर्व कर्ज महागणार; आरबीआयची पाचवी दरवाढ

त्याच्या या सर्व यशामागे निश्चितच त्याचे वडील (Kaivalya Nagare) तेजस गोकुळ नागरे व आई सोनाली तेजस नागरे यांचे श्रेय आहे. त्यांचेही सर्वत्र कौतुक होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.