Kajol remembers her father : ‘फादर्स डे’च्या निमित्ताने काजोलने दिला मुलीवर विश्वास ठेवण्याचा सल्ला

Kajol remembers her father: On the occasion of 'Father's Day', Kajol advises to believe in daughter मुलींवर इतका विश्वास दाखवा की त्यांना समाजाचा दबाव जाणवणार नाही. या आत्मविश्वासाने आपण आपल्या मुलींना शक्ती दिली पाहिजे, असं काजोल म्हणतेय.

एमपीसी न्यूज – जून महिन्यामधील चौथा रविवार हा जगभरात ‘फादर्स डे’ म्हणजे पितृदिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाच्या निमित्ताने आपल्या बाबांना शुभेच्छा देण्यासाठी प्रत्येक मुलगी उत्सुक असते. मग याला चित्रपटसृष्टीतल्या मुलीदेखील कशा बरं अपवाद असतील. हिरॉईन असल्या तरी त्यांची आपल्या बाबांशी अ‍ॅटॅचमेंट असते.

आपल्या बाबांना अशाच वाढदिवसाच्या आणि फादर्स डेच्या शुभेच्छा एका सेलिब्रेटी मुलीने दिल्या आहेत. काजोलने आपले बाबा म्हणजे शोमू मुखर्जी यांना त्यांच्या वाढदिवसाच्या आणि फादर्स डेच्या शुभेच्छा दिला आहेत. शोमू मुखर्जी यांचे 2008 साली निधन झाले. अभिनेत्री काजोल आणि तनीषा या त्यांच्या दोन मुली आहेत. काजोल आपल्या बाबांच्या खूप जवळ होती. शोमू मुखर्जी हे बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध नाव होते. त्यांनी दिग्दर्शक, लेखक आणि निर्माता म्हणून इंडस्ट्रीत काम केले आहे.

या व्हिडिओमध्ये काजोल म्हणाली, ‘आज म्हणजे 20 जून रोजी माझे बाबा शोमू मुखर्जी यांचा वाढदिवस आहे. मला अजूनही त्यांची खूप आठवण येते. मला बघितले की चमकणारे त्यांचे डोळे मला आजही आठवतात. माझ्या जन्मापासूनच माझ्या लक्षात आले आहे की माझ्यावर विश्वास ठेवणारा कोणीतरी आहे. आणि ते म्हणजे माझे बाबा होते. मी नेहमीच सर्वकाही ठीक करु शकते, असा विश्वास त्यांनी मला नेहमी दिला. त्यांचा माझ्यावर खूप भरवसा होता.’

फादर्स डे च्या अ‍ॅडव्हान्स शुभेच्छा देताना काजोल पुढे म्हणते की, ‘मला या खास प्रसंगी प्रत्येक वडिलांना सांगायचे आहे की त्यांनी आपल्या मुलीवर विश्वास ठेवावा. माझ्या मते विश्वास हा जगातील सर्वात शक्तिशाली शब्द आहे. मुलींवर इतका विश्वास दाखवा की त्यांना समाजाचा दबाव जाणवणार नाही. या आत्मविश्वासाने आपण आपल्या मुलींना शक्ती दिली पाहिजे’.

जुन्या पिढीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक शशधर मुखर्जी यांचा मुलगा असलेल्या यांनी शोमू मुखर्जीने बॉलिवूडमध्ये ‘फिफ्टी फिफ्टी’, ‘पत्थर के इंसान’, ‘संगदिल सनम’ यांची निर्मिती आणि दिग्दर्शन केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.