Vadgaon Maval News: काकड आरती सोहळ्याची मोठ्या भक्तिमय वातावरणात सांगता

एमपीसी न्यूज : वडगाव मावळ येथील श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानच्यावतीने श्री दत्त मंदिरात कोजागिरी पौर्णिमा ते त्रिपुरारी पौर्णिमा या एक महिन्यांच्या कालावधीत चाललेल्या काकड आरती सोहळ्याची सांगता सोमवार (दि 30) रोजी हभप दिलीपमहाराज खेंगरे यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली.  

श्री पोटोबा महाराज मंदिर या ठिकाणी ग्रामदिंडी प्रदक्षिणा घेऊन नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.  खेंगरे महाराजांनी संत तुकाराम महाराजांच्या पाहती गौळणी l तंव ती पालथी दुधाणी ll म्हणती नंदाचिया पोरें l आजी चोरी केली खरे ll या अभंगावर निरूपण केले.  कीर्तनाला गायन साथ शिवाजी शिंदे, महेंद्र  ढोरे, शंकर म्हाळसकर सह काकड आरती भजनी मंडळातील सदस्यांनी केली. पखवाज साथ मृदुंगमणी हरियाली पानसरे, संतोष ढोरे यांनी केली.

गेले महिनाभर सुरू असलेल्या काकड आरती व सांगता सोहळ्याचे नियोजन आयोजन देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, सचिव अनंता कुडे, विणेकरी पंढरीनाथ भिलारे, बबनराव भिलारे, विश्वस्त उपाध्यक्ष गणेशआप्पा ढोरे सहसचिव किरण भिलारे, विश्वस्त तुकाराम ढोरे, अरुण चव्हाण,  चंद्रकांत ढोरे, सुभाषराव जाधव,अॅड.अशोक ढमाले, अॅड तुकाराम काटे, सुनिता कुडे, नारायण ढोरे, देवराम कुडे, मधुकर पानसरे, केदार भेगडे, दिनकर तुमकर, रोहित कोरके, शांताराम कुडे,रविंद्र तुमकर, किशोर गायकवाड, कैलास पाटोळे, पुजारी सुरेश गुरव आदीनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.